अमरावती येथे ‘राष्ट्रीय महिला संसद’

women12

मुंबई, 8 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

‘राष्ट्र उभारणीसाठी महिलांचे सक्षमीकरण’ (EMPOWERING WOMEN FOR NATION BUILING) या विषयावर 10 ते 12 फेब्रुवारी या काळात राष्ट्रीय महिला संसदेचे आयोजन विजयवाडा (अमरावती) आयोजित करण्यात आले आहे. आंध्रप्रदेश विधानसभा, आंध्रप्रदेश सरकार आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या संयुक्त या संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतात प्रथमच अशाप्रकारची परिषद आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड एज्युकेशनल रीसर्च (माईर) आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राहूल कराड यांनी दिली.

भारतीय संसद तसेच देशाच्या सर्व राज्य विधिमंडळातील महिला लोकप्रतिनिधी यांच्यासह देशभरातील उच्च शिक्षण घेणारे सुमारे 10 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी परिषदेतील प्रबोधनात्मक चर्चासत्र/संवाद सत्रामध्ये सहभागी होत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.