पनवेलमध्ये २६ जूनला ‘स्वरचित काव्य’ स्पर्धा  

पनवेल, 20 जून 2017/AV News Bureau:

अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखेच्यावतीने महाकवि कालिदास सप्ताहानिमित्त सोमवार, 26 जून रोजी पनवेल व उरण तालुक्यातील कवि-कवयत्रींसाठी पनवेलमध्ये ‘स्वरचित काव्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

नवकवी, शिघ्रकवी व बुजूर्ग कवी यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावा आणि कवींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या पनवेल शाखेच्यावतीने काव्य स्पर्धेचे आयोजन केले जाते.  ही स्पर्धा पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागॄहात सायंकाळी 4 वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष महेश केळूस्कर तर अध्यक्ष म्हणून सुप्रसिध्द गझानवाज अे. के.शेख उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविणारया तीन स्पर्धकांस रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास 3 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 2 हजार रूपये, तॄतीय क्रमांकास 1 हजार रूपये तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी 500 रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभाग घेण्याची अंतिम तारिख 24 जून असून पनवेल व उरण तालुक्यातील सर्व कवींनी व साहित्यप्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धकांना उत्तेजन द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी अनिल कोळी (9769409161), अमोल खेर(9820233349), स्मिता गांधी(9029914867) किंवा शामनाथ पुंडे (9821758147) यांच्याशी सपंर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.