पनवेल तालुका पत्रकार मंचतर्फे शालेय साहित्याचे वाटप

Manch1

पनवेल, 23 जून 2017/AVNews Bureau:

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचतर्फे दुंदरेपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याना शालेय व क्रीडा साहित्याचे  आज वाटप  करण्यात आले.

या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार व मंचाचे सल्लागार माधव पाटील,अध्यक्ष हरेश साठे, सरचिटणीस नितीन कोळी, माजी अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य अविनाश कोळी, विवेक पाटील,  संजय कदम, प्रशांत शेडगे, प्रविण मोहोकर, राजू गाडे, संदीप भगत, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन संतोष करमेलकर, माजी चेअरमन दिलीप उलवेकर, नारायण चौधरी, मुख्याध्यापिका अपर्णा देशमुख, उपशिक्षक चंद्रकांत देवडे, तसेच विलास सिनारे, संजय जळे, दर्शना शेळके आदी उपस्थित होते.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत झाली पाहिजे, हा प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून मंच काम करीत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मदत देण्याचा आमचा प्रयत्न असेल,  असे माधव पाटील यांनी सांगितले.