नवी मुंबईचा स्वरांश कोळी मास्टरमाइंड नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत चमकला

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 30 जुलै 2023

पुणे येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या मास्टरमाइंड नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत नवी मुंबईचा स्वरांश कोळीने चमकदार कामगिरी करीत उत्तम यश संपादन केले आहे. पुणे शिवाजी नगर येथील भारतीय विद्या भवन येथे पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात स्वराश कोळी याला 2 सन्मान चिन्ह , 3 मेडल आणि विशेष प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

सन 2022-23 च्या मास्टरमाइंड नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत स्वरांश कोळी याने चमकदार कामगिरी करीत प्रथम तसेच द्वितीय क्रमांक पटकावला आहे. भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम, नवी मुंबई येथे शिक्षण घेत असलेला स्वरांश अत्यंत हुशार असून लहानपणापासूनच विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करीत आहे. स्वरांशच्या या यशामुळे नवी मुंबईचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकले आहे. त्याच्या या नेत्रदिपक यशामुळे कौतूक करण्यात येत आहे.

========================================================

========================================================