मेगाब्लॉकमुळे (6 ऑगस्ट) गाड्यांचे वेळापत्रक बदलले

मुंबई, 5 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्गाची देखभाल आणि तांत्रिक दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेतर्फे मेन आणि हार्बर मार्गावर 6 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकच्या काळात लोकल तसेच पॅसेंजर गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

 

मुलुंड-माटुंगा अप फास्ट लाइनवर सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.20पर्यंत मेगाब्लॉक

  • सकाळी 10.59 ते सायंकाळी 4.20 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट मार्गावरील गाड्या मुलुंड आणि परळ स्टेशनच्या दरम्यान स्लो मार्गावर चालविण्यात येणार आहेत.या गाड्या सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येईल. परळ आणि सीएसएमटीदरम्यान अप फास्ट मार्गावर या गाड्या पुन्हा चालविण्यात येतील. या गाड्या भायखळा स्थानकावर थांबवण्यात येतील. तसेच 20 मिनिटे उशिराने गाड्या धावतील.
  • सकाळी 10.8 ते दुपारी 2.42 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाउन फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर,मुलुंड, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील तसेच या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.

 

रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी

  • गाडी क्रमांक 50104 रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंत चालविण्यात येईल आणि गाडी क्रमांक 50103 दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दादर ऐवजी दिवा येथून रत्नागिरीला रवाना होईल.

पनवेल-नेरूळ अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.20 ते सायंकाळी 4 या काळात मेगाब्लॉक

  • सकाळी11.14 ते सायंकाळी 4.15 या काळात बेलापूर ते सीएसएमटी दरम्यान सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या आणि सकाळी 11.1 ते सायंकाळी 4.26 या काळात नेरुळ ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या बंद ठेवण्यात येतील.
  • मेगाब्लॉकच्या काळात सकाळी 11.4 ते सायंकाळी 3.53 याकाळात पनवेलवरून सुटणाऱ्या सर्व अप पनवेल-ठाणे ट्रान्सहार्बर गाड्या तसेच सकाळी 11.42 ते सायंकाळी 4.4 या काळात नेरुळवरून सुटणाऱ्या सर्व डाउन ठाणे-पनवेल गाड्या पनवेल आणि नेरुळदरम्यान बंद ठेवण्यात येतील.
  • मेगाब्लॉकच्या काळात पनवेल/अंधेरी गाड्यांची सेवा बंद राहणार आहे.
  • मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी-नेरुळ आणि ठाणे-नेरुळदरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.