नवी मुंबई महापालिकेचा 3 हजार 152 कोटींचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई, 20 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

नवी मुंबई महापालिकेचा सन 2018-19 चे अर्थसंकल्प आज आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी स्थायी समितीपुढे सादर केला. 2987.14 कोटी जमा आणि अखेरच्या शिलकेसह 2987.14 कोटी रूपये खर्चाचे 589.68 कोटी आरंभीच्या शिलकेसह 3151.93 कोटी जमा आणि 3150.93 कोटी खर्चाचे आणि 99.91 शिलकेचा अर्थसंकल्प आहे.

थोडक्यात ठळक बाबी

  • मालमत्ता कर, नगररचा विभागामाफत मिळणारे शुल्क, शासकीय करापोटी मिळणारे अबाजू अनुदान, नोंदणी शुल्क आदी उत्पन्नाच्या बाजू दाखविण्यात आल्या आहेत. मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी लीडार प्रणाली वापरण्याचे प्रस्तावीत करण्यात आले आहे.

 

  • वाहतूक कोंडी मुक्त रस्ते करण्यासाठी ई बाईक, स्मार्ट सायकल हे पर्याय सुरू करण्यात येणार आहे.

 

  • शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी 63 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

 

  • केंद्र शासनाच्या अमृत प्रकल्पाअंतर्गत वाशी, कोपरखैरणे, ऐरोली येथील औद्योगिक कंपन्यांना सांडपाणी प्रक्रिया केलेले पाणी पुरविण्यासाठी 132.86 कोटी इतक्या रकमेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या शासनाचा यामध्ये 50 टक्के हिस्सा असणार आहे.

 

  • नवी मुंबई शहरातील उद्यानांचा 360 डिग्री व्हिडीओ तयार करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग पर्यटन विकसीत करण्यासाठी होणार आहे.

 

  • महापालिका वैद्यकीय पदव्युत्तर पदवी सी.पी. एस अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 100 लक्ष तरतूद करण्यात आली आहे. टायफॉईट लसीकरण प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार सर्व प्रथम नवी मुंबई राबविण्यात येणार आहे. यामध्ये 9 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना 4 लाख डोसेस देण्यात येणार आहे.

 

  • दिव्यांग व्यक्तींच्या उपचारासाठी हायड्रोथेरपी कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

 

  • महापालिकेचे नाइट कॉलेज सुरू करण्यात येणार आहे.

 

  • आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या राज्यस्तरीय शाळा निवडीकरिता महापालिकेच्या दोन शाळा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

 

  • महिलांसाठी 10 तेजस्विनी बस सुरू करण्यात येणार आहेत.