मंगळवारपासून पेट्रोलपंपांवर “जागो मुंबईकर जागो”

मुंबई, 17 सप्टेंबर 2017/AV News Bureau: congress on petrol price hike

डिझेल, पेट्रोलचे दर वाढवून सरकारने सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा दणका दिला आहे. मुंबईकरांवर 59.9 टक्के कर लावला असून तो रद्द करावा आणि  पेट्रोल,डिझेलवरही GST (28 टक्के) लागू करावा, ज्यामुळे पट्रोलचा दर 50 टक्क्यांनी कमी होईल. याबाबत मुंबईकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी येत्या मंगळवारपासून शहरातील पेट्रोलपंपांवर जागो मुंबईकर जागो आंदोलन करणार असल्याचा इशारा मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला आहे. congress on petrol price hike

 

मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 79.54 रुपये आणि डिझेलचा दर 62.46 रुपये आहे. जो या देशात सर्वात जास्त आहे. दुष्काळाच्या नावाने जो 11 रुपये सरचार्ज लावला जातो, ते सुद्धा चुकीचे आहे. एकूण 59.5% कर पेट्रोल आणि डीझेल मुंबईकरांवर लावला जातो, जो सर्वात जास्त आहे आणि याला आमचा विरोध आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डीझेल उत्पादनांवर GST लागू करावा. GST 28% आहे. त्यामुळे GST लागू केल्यानंतर पेट्रोलचा दर 50 टक्क्यांनी कमी होईल आणि मुंबईकरांना न्याय मिळेल. 19 सप्टेंबर पासून मुंबईतील 60 मुख्य पेट्रोलपंपांवर काँग्रेसचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन आणि पत्रक घेऊन उभे राहणार आणि येणाऱ्या लोकांना ते पत्रक देणार आणि आवाहन करणार “जागो मुंबईकर जागो.” ज्या भाजपने तुम्हाला अच्छे दिनचे आश्वासन दिले होते, त्या भाजपने जाणूनबुजून तुमचे पाकीट कापण्याचे षड्यंत्र रचलेले आहे. अशा भाजपा आणि त्याची सहकारी शिवसेनेच्या विरोधात आम्ही जनजागरण अभियान आम्ही सुरु करणार आहोत. मंगळवार पासून प्रत्येक मुक्या पेट्रोलपंपवर सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 7 काँग्रेसचे कार्यकर्ते उभे राहतील असे निरुपम यांनी सांगितले. congress on petrol price hike

 

भांडूप पोटनिवडणूक

  • भांडूप येथे होणाऱ्या महापालिकेच्या पोटनिवडणूकीबद्दल बोलताना संजय निरुपम म्हणाले की या देशामध्ये ईव्हीएम मशीनवर कोणालाही विश्वास नाही. कारण ईव्हीएम मशीनमुळे भाजपने संपूर्ण देशामध्ये निवडणुकीत घोळ केला. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीनचा वापर झाला नाही. त्या ठिकाणी भाजप हरली. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे की भांडूप येथील महापालिका वार्ड क्र. 116 येथे होणाऱ्या पोटनिवडणूकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये पेपर ट्रे (वोटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडीट ट्रे) (VVPAT) चा वापर करावा. ज्यामध्ये मत दिल्यावर मतदाराला त्याची पोच (स्लीप) मिळते. नांदेड येथील निवडणुकांमध्ये या तंत्राचा वापर होणार आहे. यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत, असे निरुपम म्हणाले.