नवी मुंबईत उद्यापासून पार्किंग सर्वेक्षण

सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 4 एप्रिल 2018:

नवी मुंबईतील पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी 5 ते 20 एप्रिल या कालावधीत शहरातील पार्किंगचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आय.आय.टी. मुंबई ही संस्थेस हे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करणार आहे.

नवी मुंबईतील पार्किंग समस्येबाबात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याक आली होती. या याचिका क्र. 123/2016 मध्ये 5 ऑक्टोबर 2016 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेल्या अंतरिम आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील पार्किंगचे शास्त्रोक्त सर्व्हेक्षण (Scientific Survey) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने आय.आय.टी. मुंबई या संस्थेस हे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले असून, नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महानगरपालिका क्षेत्रांतर्गत पार्किंगचे सर्वेक्षण करण्याचे काम 05 एप्रिल ते दि. 20 एप्रिल 2018 या जवळपास दोन आठवड्याच्या कालावधीत हाती घेण्यात येत आहे. हे सर्वेक्षण उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असून सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेच्या कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या  महानगरपालिका कर्मचारी / प्रतिनिधी यांना पार्किंग सर्वेक्षणासंबंधी आवश्यक माहिती देऊन संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांच्या वतीने करण्यात आले आहे.