मराठा क्रांती मोर्चाच्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद

  • नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाची घोषणा

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 8 ऑगस्ट 2018:

मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील शाळा बंद राहणार असल्याचे नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने कळविले आहे.

  • मराठा क्रांती मोर्चातर्फे बंद पुकारण्यात आला आहे. तणावाची परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या दोन्ही सत्रातील शाळा बंद राहणार असल्याचे महापालिका शिक्षण विभागाने कळविले आहे. तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळे, भाजीपाला आणि कांदा-बटटा मार्केटचे व्यवहार पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

  • दरम्यान, आंदोलनाच्या पाश्वभूमीवर नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 6 पोलीस उपआयुक्त, 8 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस अधिकारी, दीड हजार पोलीस कर्मचारी यांच्यासोबतच राज्य राखीव पोलीस बल गटाच्या 3 तुकड्या, जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथकाच्या 2 तुकड्या, सोबतच 40 पोलीस स्ट्रायकिंग पथक, वज्र आणि वरूण ही वाहनेही तैनात असणार आहेत. शहरातील मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे.

=======================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • तालवाद्यांचा जादुगर- करण पाटील

========================================================================================================================

  • गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी 6 गाड्या
    https://goo.gl/F3pv1B