अलाहाबादमध्ये कासवांसाठी आश्रयस्थान   

    नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

गंगा नदीमध्ये असलेल्या समृद्ध जैवविविधतेचं रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने कासवांसाठी अलाहाबादमध्ये आश्रयस्थान निर्माण करण्यात येणार आहे. ‘नमामि गंगा’ कार्यक्रमाअंतर्गत हे आश्रयस्थान निर्माण होणार आहे. तसेच ‘संगम’ येथे नदी जैवविविधता उद्यानाची निर्मितीही करण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी अंदाजे 1.34 कोटी रुपये खर्च येणार आहे. गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या त्रिवेणी संगमस्थानावर हे उद्यान तयार करण्यात येणार आहे. तसेच कासवांसाठी स्थायी स्वरुपाचे संगोपन केंद्र उभारण्यात येणार आहे.

गंगेमध्ये जवळपास 2 हजार प्रजातीचे जलचर आढळतात. यामध्ये सुसरी, मगरी, डॉल्फीन, कासव यांचाही समावेश आहे.

पर्यावरणाचे आणि जैवसाखळीमध्ये जलचरांचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन या उद्यानाची आणि कासव आश्रयस्थानाची निर्मिती करण्यात येणार आहे.