बदलापूर- कर्जत दरम्यान ट्रॅफीक ब्‍लॉक

मुंबई, 1 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

नेरल स्‍थानकावर पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मध्‍य रेल्‍वेने 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1या कालावधीत ट्रॅफीक आणि पॉवर ब्‍लॉक घेण्‍याचा निर्णय घेतला आहे.  हा ब्‍लॉक बदलापुर आणि कर्जत स्‍थानका दरम्‍यान अप आणि डाऊन (दक्षिण-पुर्व) मार्गावर घेण्‍यात येणार आहे.

 

उपनगरीय लोकल सेवा अंशत: रद्द

  1. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 11 आणि 10.36 ला सूटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथ स्‍थानकापर्यंत चालविण्‍यात येईल. (ही लोकल अंबरनाथ आणि कर्जत दरम्‍यान रद्द राहील)
  2. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 38 आणि 11.15 वाजता सूटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल बदलापुर स्‍थानकापर्यंत चालविण्‍यात येईल. (ही लोकल बदलापुर आणि कर्जत दरम्‍यान रद्द राहील)
  3. ठाणे येथून सकाळी 48 वाजता सूटणारी ठाणे-कर्जत लोकल बदलापुर स्‍थानकापर्यंत चालविण्‍यात येईल. (ही लोकल बदलापुर आणि कर्जत दरम्‍यान रद्द राहील)
  4. कर्जत येथून दुपारी 01 आणि 1 वाजता सूटणारी कर्जत-सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्‍थानकापासून चालविण्‍यात येईल. (ही लोकल कर्जत आणि अंबरनाथ दरम्‍यान रद्द राहील)
  5. कर्जत येथून सकाळी 10.45 आणि 11.19 वाजता सूटणारी कर्जत-सीएसएमटी लोकल बदलापुर स्‍थानकापासून चालविण्‍यात येईल. (ही लोकल कर्जत आणि बदलापुर दरम्‍यान रद्द राहील)
  6. कर्जत येथून दुपारी 21 वाजता सूटणारी कर्जत-ठाणे लोकलची सेवा बदलापुर स्‍थानकापासून चालविण्‍यात येईल. (ही लोकल कर्जत आणि बदलापुर दरम्‍यान रद्द राहील)

 

मेल/एक्‍सप्रेस गाड्यांच्‍या मार्गात बदल

27032 हैदराबाद-छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस एक्‍सप्रेस, 11042 चेन्‍नई- छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस एक्‍सप्रेस आणि 11014 कोईम्‍बटूर-लोकमान्‍य टिळक टर्मिनस एक्‍सप्रेस कर्जत-पनवेल-दिवा या मार्गाने जातील.

या गाड्या कल्‍याणच्‍या प्रवाशांच्‍या सोयीसाठी दिवा स्‍थानकात थांबविण्‍यात येतील. तसेच या गाड्या 20 ते 30 मिनिटे उशिराने धावतील.