महाराष्ट्र आणि आस्ट्रेलिया विधीमंडळादरम्यान सामंजस्य करार

 

महाराष्ट्र आणि आस्ट्रेलिया विधीमंडळादरम्यान सामंजस्य करार

मुंबई,  8 डिसेंबर 2017/ Avirat Vaatchal News :

महाराष्ट्र आणि आस्ट्रेलिया यांच्यातील विधीमंडळ कामकाजाचा अभ्यास करता यावा यासाठी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन विधीमंडळाबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सांगितले. व्हिक्टोरियन विधीमंडळाच्या शिष्टमंडळाने आज विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती यांची भेट घेतली.

महाराष्ट्र आणि आस्ट्रेलिया या दोघांमधील, पर्यटन, उद्योग आणि व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वृद्धींगत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन विधीमंडळाचे अध्यक्ष कोलीन ब्रुक्स यांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळात सदस्य जॉश बुल, कॅकस सेक्रेटरी,निल अॅन्गस, मार्टीन डिक्सन, रोझलींड स्पेन्स, विकी वार्ड आणि सान्थी सिन्निह यांचा समावेश होता.