रायगड जिल्ह्यातील 59 गावांचा पर्यटन विकास यादीत समावेश

जिल्ह्यासाठी 243 कोटींचा पर्यटन आराखडा

नागपूर, 18 डिसेंबर 2017/ avirat vaatchal news:

रायगड जिल्ह्यातील 59 गावांचा पर्यटन विकासाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी 243 कोटींच्या विकास आराखड्याला लवकरच मंजूरी देणार असल्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

रायगड जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने 243 कोटींची विविध कामे केली जाणार आहे.  हा आराखडा तयार करण्यासाठी कन्सल्टंट सर्व्हीसेस,पुणे या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 5 लाख रु.वितरित करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला पर्यटन आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार एकूण 12 जिल्ह्यांचे आराखडे अंतीम मंजूरीसाठी सरकारकडे आहेत. विधानपरिषद सदस्य जयंत पाटील यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

रायगड किल्ल्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी रायगड किल्ला प्राधिकरण स्थापित करण्यात येणार असल्याचे रावल यांनी सांगितले.