मुंबई महापालिकेत नोकरभरती

  • विविध 1388 रिक्तपदे भरणार
  • 31 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख

मुंबई, 17 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

मुंबई महानगरपालिकेत ड संवर्गातील कामगारांची भरती करण्यात येणार आहे. 1388 पदांसाठी 31 डिसेंबर 2017 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.  विविध खाते, विभाग, रुग्णालये यांच्या आस्थापनांवरील कामगार, कक्ष परिचर, श्रमिक, हमाल, बहुउद्देशीय कामगार, आया या संवर्गातील ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. 11 डिसेंबर 2017 पासून रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून  31 डिसेंबर 2017 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.  10 वी परीक्षा 100 गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. इच्छुक उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. recruitment in mumbai municipal corporation

 

भरण्यात येणाऱ्या पदांसाठी आवश्यक शिक्षण

उमेदवाराने किमान 10 वी परीक्षा 100 गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वेतनश्रेणी

PBi- 5,200 ते 20,200 रुपये + ग्रेड पे 1800 रुपये

 

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे 30 नोव्हेंबर 2017 रोजीचे वय गृहीत धरण्यात येईल.
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार -18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार – 18 ते 43 वर्षे
  • माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 मधील पदांसाठी नेमणूकीकरीता विहित वयोमर्यादेतील सूट ही त्या उमेदवाराच्या सशस्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहणार आहे. याशिवाय माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 मधील पदांसाठी नेमणुकीसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंत राहील.
  • स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य,  या घटकातील उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील.  ही वयोमर्यादा सरसकट शिथिल केलेली असल्याने या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील.
  • शासन निर्णयानुसार खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन कामगार, कक्षपरिचर, श्रमिक, हमाल, बहुउद्देशीय कामगार, स्मशान कामगार, आया आदी पदांसाठी असलेली वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात येईल. उच्चतम वयोमर्यादा 43 वर्षे इतकी असणार आहे.

वजन व उंची

  • पुरुष उमेदवार- किमान वजन 50 कि.ग्रॅ. आणि उंची 157 सें.मी.
  • महिला उमेदवार – किमान वजन 45 कि.ग्रॅ. आणि उंची 150 सें.मी.

परिक्षा

  • प्रत्येक उमेदवाराची online  परीक्षा ही 100 प्रश्नांची असेल. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरालाला 1 गुण देण्यात येईल. चुकीच्या उत्तराला शून्य गुण देण्यात येतील.
  • Online परिक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल.
  • गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने online परिक्षेत 100 पैकी किमाण 50 गुण मिळवणे आवश्यक आहे.

परिक्षेचा अभ्यासक्रम

  • मराठी- 40 गुण
  • इंग्रजी -10 गुण
  • सामान्य ज्ञान – 25 गुण
  • अंकगणित आणि तर्कज्ञान -25 गुण

ठळक मुद्दे

  • पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामाइक एकत्रित गुणवत्तायादी तयार करून त्या गुणवत्ता यादीमधील उच्च गुणवत्ताधारक मागासवर्गीय उमेदवारांचा खुल्या प्रवर्गाच्या पदासाठी विचार करण्यात येईल.
  • दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांचे गुण समान झाल्यास उमेदवाराच्या जन्मदिनांकानुसार वयोज्येष्ठतेने प्राधान्यक्रम देण्यात येईल.
  • समांतर आरक्षणांतर्गत राखीव असलेल्या पदांकरीता पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरची पदे त्याच सामाजिक प्रवर्गातून  समांतर आरक्षणविरहित म्हणून भरली जातील. निवड झालेले  उमेदवार काही कारणास्तव अपात्र ठरणे, संपर्क न साधणे आदी कारणांमुळे रिक्त ठरलेली पदे पुढील गुणवत्ता यादीनुसार भरण्यात येतील.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी

  • जाहीरात http://portal.mcgm.gov.in या महापालिकेच्या संकेतस्थळावर आहे.
  • इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज http://portal.mcgm.gov.in किंवा https mcgmlabourrecruitment mahaonline gov in संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
  • इच्छुकांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन ‘Labour Recruitment 2017’ या लिंकवर क्लिक करावे आणि सर्वप्रथम आवश्यक माहिती 4.5 सें.मी. x 3.5 सें.मी. साइजचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून (20 ते 50 kb पर्यंत) अपलोड करणे. तसेच Online पैसे भरल्यानंतर उमेदवारास अर्ज क्रमांक मिळेल.

भरती प्रक्रिया शुल्क

  • खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी 400 रुपये
  • माजी सैनिकांनी परीक्षा दिल्स शुल्क भरण्याची आवश्यकता नाही

महिलांसाठी आरक्षण

  • महिलांसाठी 30 टक्के आरक्षण ठेवण्यात येईल. मात्र एखाद्या प्रवर्गात त् प्रमाणात महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे त्या प्रवर्गाच्या पुरूष उमेदवारांमधून भरण्यात येतील.  खेळाडूंसाठी 5 टक्के समांतर आरक्षण ठेवण्यात येईल. recruitment in mumbai municipal corporation