फेरीवाल्यांना बायमेट्रीक सर्वेक्षणासाठी पुन्हा संधी

  • नवी मुंबई महापालिकेचे फेरीवाल्यांना जाहीर आवाहन

नवी मुंबई, 2 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या पथविक्रेत्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक (Mobile No.) आधारकार्डशी लिंक न केल्यामुळे त्यांचे जीआयएस बेसड् डिजीटल बायोमेट्रीक सर्वेक्षण होऊ शकले  नाही, अशा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांना त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक (Mobile No.) आधारकार्डशी लिंक करणेबाबत नव्याने जाहीर आवाहन करण्यात येत आहे. सर्व विभाग कार्यालयांमध्ये नाममात्र शुल्क आकारुन ही सुविधा दिली जाते. जे पथविक्रेते त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक (Mobile No.) आधारकार्डशी लिंक करणार नाहीत, व त्यामुळे त्यांचे जीआयएस बेसड् डिजीटल बायोमेट्रीक सर्वेक्षण न झाल्यास त्यास नवी मुंबई महापालिका जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

ज्या पथविक्रेत्यांचे यापुर्वी जीआयएस बेसड् डिजीटल बायोमेट्रीक सर्वेक्षण झालेले आहे, त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे दिनांक 15/02/2018 पासून संबंधित विभाग कार्यालयात जमा करावीत, असे जाहीर आवाहनही महापालिकेने  केले आहे.