बेलापूर, घणसोलीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

 

नवी मुंबई, 5 एप्रिल 2018,अविरत वाटचाल न्यूज :

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवरील कारवाई सुरूच असून आज बेलापूर व घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा उचलण्यात आला.

  • बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रांतर्गत करावे मधील साईवाडी येथे चंद्रकांत कोळी यांचे तीन मजली 80.00 चौ.मी. क्षेत्रफळाचे व अराफत शेख यांचे तीन मजली 95.00 चौ.मी. क्षेत्रफळाचे अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्यात आले.

 

  • घणसोली विभाग कार्यक्षेत्रामधील अर्जुनवाडी येथे वसीम खान यांनी अनधिकृतरित्या केलेले  तळमजल्याचे इमारत बांधकाम तोडण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व विभागीय स्तरावर अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा चालविला जात आहे.