नवी मुंबईत चौदा बेकायदेशीर शाळा

अविरत वाटचाल न्यूज,नवी मुंबई, 6 एप्रिल 2018:

शासनाची तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता महापालिका क्षेत्रात चालविल्या जाणा-या चौदा अनधिकृत शाळांची यादी महापालिकेने प्रसिध्द केली आहे. आर.टी.आई. अधिनियम 2009 मधील कलम 18 अन्वये कोणतीही शाळा शासनाच्या मान्यतेशिवाय चालविण्यात येणार नाही तसे केल्यास शाळा व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

 

  • दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत असंख्य शाळा या परवानगी न घेता सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र दरवर्षी अशा शाळांची यादी जाहीर करण्यापलिकडे महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची कडक कारवाई केली जात नाही.  त्यामुळे भविष्यात या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैैक्षणिक नुकसान झाले तर त्यांची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक व्यक्त करू लागले आहेत. 

नवी मुंबई शहरातील अनधिकृत शाळांची यादी