आपत्ती तक्रारीसाठी 1800222309 / 1800222310 टोल फ्री क्रमांक

नवी मुंबई महापालिकेचा पावसाळी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू

अविरत वाटचाल न्यूज  

नवी मुंबई, 29 मे 2018 :

पावसाळी कालावधीत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. पावसाळी कालावधीसाठी महापालिकेचा पावसाळी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम होण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळे तसेच विभाग स्तरावर नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिमंडळ 1 साठी उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार तसेच परिमंडळ 2 साठी उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगीरे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. याशिवाय विभाग कार्यालय स्तरावर संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. याशिवाय सर्व आठही विभाग कार्यालयात दिवसरात्र आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे.

विभाग कार्यालय स्तरावर संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये बेलापूर विभागाकरिता अजय संख्ये, नेरूळ करिता सुभाष सोनावणे, वाशी करिता अरविंद शिंदे, तुर्भे करिता मनोज पाटील, कोपरखैरणे करिता संजय देसाई, घणसोली करिता अनिल नेरपगार, ऐरोली करिता शरद काळे व दिघा करिता गिरीष गुमास्ते या कार्यकारी अभियंता यांची विभाग कार्यालय स्तरावरील मोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

हे नोडल अधिकारी संबंधित विभागाच्या विभाग अधिकारी यांच्यासमवेत आपापल्या विभागीय क्षेत्रातील पावसाळापूर्व कामांची पाहणी करून त्यामधील उणीवा अथवा त्रुटी दूर करावयाच्या आहेत व तसा अहवाल परिमंडळाचे नोडल अधिकारी यांच्याकडे द्यावयाचा आहे. परिमंडळ स्तरावरील नोडल अधिकारी यांनीही आपल्या परिमंडळ क्षेत्राचा संबंधित विभागाच्या नोडल अधिका-यासह दौरा करून तसा अहवाल अतिरिक्त आयुक्त मोहन डगांवकर यांचेमार्फत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचेकडे सादर करावयाचा असल्याचे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

  • वाशी अग्निशमन केंद्र (संपर्कध्वनी – 2789 4800 / 27895900) 
  • ऐरोली अग्निशमन केंद्र (संपर्कध्वनी – 27795200 / 27792400 )
  • नेरूळ ( संपर्कध्वनी – 27707101)
  •  सी.बी.डी. बेलापूर अग्निशमन केंद्र (संपर्कध्वनी – 27572111
  • विभाग कार्यालय
  • बेलापूर – 27570610
  •  नेरूळ – 27707669,
  • वाशी – 27655370,
  • तुर्भे – 27834069,
  • कोपरखैरणे – 27542449,
  • घणसोली – 27698175,
  •  ऐरोली – 27792114,
  • दिघा – 27792410