व्यवसाय परवाना नुतनीकरणास 31 जुलैची मुदत

नवी मुंबई, 24 जुलै 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या व्यवसाय परवाना नुतीनकरणासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. व्यावसायिकांनी त्वरीत ऑनलाइन अर्ज करावेत असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

परवाना विभागामार्फत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खानावळी / हॉटेल्स / लॉजींग – बोर्डींग / केश कर्तनालये / ब्युटी पार्लर / स्वीट मार्ट / दूध व दुग्धजन्य पदार्थ इत्यादींना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 376 अन्वये देण्यात आलेल्या व्यवसाय परवान्यांचे नुतनीकरण दरवर्षी करण्यात येते.

परवाना नुतनीकरणासाठी ऑनलाइन (Online) संगणक प्रणाली 6 फेब्रुवारी 2017 पासून कार्यान्वित झालेली असून सर्व परवाना धारकांनी परवाना नुतनीकरण ऑनलाइन (Online) संगणक प्रणालीव्दारे करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे धोरण आहे.

तरी, नवी मुंबई महानगरपालिका हद्‌दीतील सर्व व्यावसायिकांनी आपल्या व्यवसाय परवाना नुतनीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.rtsnmmconline.com वर दिनांक 31 जुलैपर्यंत ऑनलाइन (Online) अर्ज करावेत, अन्यथा आपल्या व्यवसायांवर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.