वीज पुरवठा सुरळित होण्यास लागणार दोन दिवस

  • तांत्रिक बिघाडामुळे मागणी व पुरवठ्याचे गणित कोलमडले

अविरत वाटचाल

नवी मुंबई,1 जून 2018:

महापारेषण च्या कळवा येथील 400/200 kv EHV सब स्टेशनमध्ये गुरूवारी 3 1 मे 2018 रोजी तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे ठाणे,मुलुंड, नवी मुंबई या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तांत्रिक दुरुस्ती करण्यास किमान शनिवार पर्यंतचा वेळ लागू शकतो. या काळात नागरिकांनी विजेचा वापर जपून करावा असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे.

कळवा येथील केंद्रातून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील ठाणे मंडळा अंतर्गत नवपाडा, कोपरी, विटावा, कळवा, मुलुंड (पु. व प.)  या परिसरास तर वाशी मंडळा अंतर्गत वाशी, ऐरोली, घणसोली, रबाळे, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तुर्भे MIDC, कोपरखैरणे, बोनकोडे या परिसराला वीज पुरवठा होतो.

सध्या या सर्व परिसराची वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याच्या प्रयत्न सुरूआहे. असे असले तरी विजेची मागणी वाढल्यास सध्या चालू असलेल्या यंत्रणेवर अधिकचा भार येऊन बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणूनच मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरता महापारेषण व महावितरणला विजेचे नियोजन करावे लागणार आहे. या काळात आवश्यकतेनुसार ठराविक वेळेनुसार काही भागात विजेचे नियोजन केल्यामुळे वीज पुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो असे महावितरण कडून कळविण्यात आले आहे.