सोसायटयांच्या पुनर्वसनासाठी मार्गदर्शक माहिती आठवडाभरात जाहीर करणार

  • महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची घोषणा

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 24 ऑक्टोबर 2018:

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचा नागरिकांशी थेट सुसंवाद या कार्यक्रमांतर्गत आज वाशी येथे शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. यावेळी नवी मुंबईतील सोसायट्यांच्या पुनर्वसनासाठी उपयुक्त ठरतील, अशा आवश्यक कागदपत्रांची माहिती एका आठवड्यात जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा आयुक्त रामास्वामी एन. यांनी केली.

वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला महापालिकेचे  अतिरिक्त आयुक्त शहर  रविंद्र पाटील, शहर अभियंता मोहन डगांवकर, परिमंडळ 1 चे उप आयुक्त  दादासाहेब चाबुकस्वार, अतिक्रमण उप आयुक्त  अमरिश पटनिगिरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार, उद्यान विभागाचे उप आयुक्त नितीन काळे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त  अमोल यादव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी 500 हून अधिक नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून आयुक्तांशी वैयक्तिक व सामुहिक स्वरुपात प्रत्यक्ष भेट घेऊन सुसंवाद साधला. यामध्ये विशेषत्वाने इमारत पुनर्वसन, मार्केट, फेरीवाले, विदयुत पथदिवे, रस्ते, गटारे याबाबतच्या तक्रारींविषयी निवेदने सादर करण्यात आली.

नवी मुंबईची निर्मिती होत असताना वाशी विभागापासून सुरुवात करण्यात आली असून येथील इमारतींच्या पूनर्वसनाचा प्रश्न जुनाच आहे. नागरिकांच्या याबाबतच्या भावना आजच्या सुसंवादातून मोठया प्रमाणात मांडण्यात आल्या असून महापालिका प्रशासन याविषयी सकारात्मक असल्याचे महापालिका आयुक्त्‍ डॉ. रामास्वामी एन. यांनी स्पष्ट केले व लवकरच याबाबतची जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येईल असे सांगितले.

 

  • सिडको निर्मित इमारतींच्या पुनर्बांधणीबाबत महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांची भूमिका

  • नागरिकांशी सुसंवादानंतर आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी अधिकाऱ्यांसमवेत विविध कामांच्या ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथील सौंदर्य अधिक खुलून दिसावे या करिता तेथील कारंजे संध्याकाळच्या वेळेत सुरु ठेवावेत असे संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वीच निर्देशित केल्यानुसार आयुक्तांच्या शुभहस्ते त्या कारंजांची सुरुवात करण्यात आली.

 

  • सेक्टर-9 येथील सेक्रेड हार्ट हायस्कूल ते वाशी बसडेपो या सागर विहार रस्त्याला समांतर सायकल ट्रॅकची पाहणी आयुक्तांनी केली व नागरिकांना पटकन लक्षात येईल अशा प्रकारे फलक सुधारणा करावी व ट्रॅकच्या पट्टयात पार्किंग होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. सेक्टर-9 येथील वॉकेबिलिटी कामाचीही पाहणी करुन दिव्यांगांनाही रस्त्यातून चालणे व ओलांडणे सोपे जावे यादृष्टीने काही महत्वाच्या सूचना त्यांनी केल्या.
  • केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत वाशी सेक्टर-10 येथे स्वामी नारायण जवळ मोकळया जागेत करण्यात येत असलेल्या हरितक्षेत्र विकास प्रकल्पाला भेट देऊन त्यांनी कामांची पाहणी केली. भारतातील सर्व प्रकारची वृक्षरोपे त्याठिकाणी लावण्यात आली असून 5400 हून अधिक वृक्षांनी व्यापलेला हा परिसर काही वर्षातच नवी मुंबईचे आकर्षण केंद्र ठरेल असे आयुक्तांनी सांगितले.

 

  • सेक्टर -11 जुहूगाव जलकुंभाजवळील जुन्या आरोग्य केंद्राच्या पडिक इमारतीच्या जागी महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था करण्याच्या दृष्टीने इमारतीचे नियोजन करण्याबाबत त्यांनी तेथील जागेची पाहणी केली. ही जागा वाशीच्या महापालिका सार्वजनिक रुग्णालयाजवळ असल्याने डॉक्टरांची निवास व्यवस्था या ठिकाणी केल्यास तात्काळ प्रसंगी व नियमितपणे डॉक्टर्स उपचारासाठी त्वरीत उपलब्ध होतील असेही आयुक्तांनी सांगितले.

 

  • नवी मुंबईत लवकरच नर्सिंग कॉलेज -महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. (मुलाखत भाग 2)

  • सेक्टर-28 मधील गटारे व रस्त्याच्या कामांची त्यांनी पाहणी केली तसेच हॉकर्स झोन व मार्केटसाठी जागा उपलब्ध्‍ करणेबाबत काही संकल्पित जागांचीही त्यांनी पाहणी केली. सेक्टर -14 वाशी, महात्मा गांधी कॉम्प्लेक्स मध्ये प्रियदर्शनी पीसपार्क येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या बांधकामाची पाहणी करुन आयुक्तांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना दिल्या.

 

  • सेक्टर -14 येथील मार्केटच्या इमारतीची पाहणी करुन एक महिन्याच्या कालावधील त्या ठिकाणी मार्केट स्थलांतरीत करणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशित केले व दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील काम दर्जा राखून गतिमानतेने पूर्ण करण्याचे सूचित केले. से-14 मराठा भवन जवळील समाज मंदिर इमारतीचीही पाहणी करुन आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या. विष्णुदास भावे नाटयगृहाजवळील अग्निशमन केंद्राच्या बांधकामाची पाहणी करत लवकरात लवकर केंद्र कार्यान्वित होण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असे त्यांनी निर्देशित केले व दुसऱ्या टप्प्यातील बांधकामही विहित वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या. 

 

  • नवी मुंबईतील विकास प्रकल्पांबाबत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याशी वन टू वन चर्चा (भाग १)

नेरुळ, दिघ्याचे आयक्तांचे दौरे पुढे ढकलले

  • 30 ऑक्टोबर 2018 रोजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा जाहीर झाल्याने यापूर्वी जाहीर करण्यात आलेला 30 ऑक्टोबरचा नेरुळ विभाग व 31 ऑक्टोबरचा दिघा विभाग पाहणी दौरा त्यादिवशी होणार नाही. या दोन्ही विभागांतील पाहणी दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

 

==================================================================================================

 

इतर बातम्यांचाही मागोवा

  • नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याशी वन टू वन विशेष मुलाखत -भाग 4