इस्कॉन नवी मुंबईतर्फे कृष्ण जन्माष्टमी महोत्सव

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 17 ऑगस्ट 2018

इस्कॉन नवी मुंबईच्या वतीने 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान खारघर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयओजन करण्यात आले आहे. 3 सप्टेंबरला श्रीकृष्ण अभिषेक सोहळा होणार आहे. यानिमित्ताने मंदिरात येणा-या भाविकांना महाअभिषेकामध्ये तुलसीपत्र, फूल, फळ अर्पण करता येणार आहेत. त्यासाठी मंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री 12 वाजता होणा-या महाअभिषेकामध्ये भाविकांच्या या दानाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष एच.जी सूरादास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या जन्माष्टमी महोत्सवाची सुरूवात 22 ऑगस्ट रोजी होणा-या झूलन यात्रा उत्सवाने होणार आहे. हा यात्रा उत्सव 26 ऑगस्ट पर्यंत रोज संध्याकाळी 7.30 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. 26 ऑगस्ट रोजी  बलराम जयंती निमित्त विशेष अभिषेक असणार आहे. 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत श्रीकृष्ण कथांचे प्रवचन होणार आहे. 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर या काळात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव होणार आहे. 4 सप्टेंबर रोजी श्रील प्रभुपाद यांच्या 122 व्या व्यास पूजेनिमीत्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यंदा भजन सम्राट अनुप जलोटा भजन सादर करणार आहेत.

===================================================================================================================================

इतर बातम्यांचाही वेध

  • तालवाद्यांचा जादुगर – करण पाटील