महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार, ठाण्यात सर्वाधिक मतदार

  • रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, १९ मार्च २०१९:

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये सात लाख 35 हजार 597 एवढ्या महिला मतदारांची संख्या आहे. ठाणे मतदार संघात राज्यात सर्वाधिक सुमारे 23 लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून 12 लाख 60 हजारांहून अधिक पुरूष मतदारांची संख्या आहे.

 

  • राज्यात दि. 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. राज्यात चार कोटी 57 लाखांहून अधिक पुरूष मतदार असून चार कोटी सोळा लाखाहून अधिक महिला मतदार आहेत.
नऊ मतदारसंघ राखीव

नंदूरबारगडचिरोली-चिमूरदिंडोरीपालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून अमरावतीरामटेकशिर्डीलातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

नागपूरशिरूर,पुणेबारामतीत 20 लाखांहून अधिक मतदार

मावळ मतदारसंघात सुमारे 22 लाखांहून अधिकशिरूर 21 लाखांहून अधिकनागपूर 21 लाखांहून अधिकपुणे आणि बारामती मध्ये प्रत्येकी 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.

मुंबईतील मुंबई-उत्तर मतदारसंघात 16 लाखांहून अधिक मतदार असून मुंबई-उत्तर दक्षिण मतदार संघात  16 लाख 98 हजार मतदार आहेततर मुंबई-उत्तर पूर्व मतदारसंघात 15 लाख 58 हजार मतदार आहेत. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात 16 लाख 48 हजार आणि मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात 14 लाख 15 हजार एवढे मतदार आहेत.

मतदारसंघनिहाय एकूण मतदारांची संख्या (सुमारे) : 

नंदूरबार-18 लाख 50 हजारधुळे-18 लाख 74 हजारजळगाव-19 ला 10 हजाररावेर-17 लाख 60 हजाबुलढाणा-17 लाख 46 हजारअकोला-18 लाख 54 हजारअमरावती-18 लाख 12 हजारवर्धा-17 लाख 23 जाररामटेक-18 लाख 97 हजारभंडारा-गोंदिया-17 लाख 91 हजारडचिरोली-चिमूर-15 लाख 68 हजारचंद्रपूर-18 लाख 90 हजारयवतमाळ-वाशिम-18 लाख 90 हजारहिंगोली-17 लाख 16 हजारनांदेड-17 लापरभणी-19 लाख 70 हजारजालना18 लाख 43 हजारऔरंगाबाद-18 ला 57 हजारदिंडोरी-17 लाखनाशिक-18 लाख 51 हजारपालघर-18 ला 13 हजारभिवंडी-18 लाख 58 हजाकल्याण-19 लाख 27 हजाररायगड-16 लाख 37 हजारअहमदनगर-18 लाख 31 हजारशिर्डी-15 लाख 61 हजारबीड-20 लाख 28 हजारउस्मानाबाद-18 लाख 71 हजारलातूर-18 लाख 60 हजारसोलापूर-18 लाख 20 हजारमाढा-18 लाख 86 हजार, सांगली-17 लाख 92 हजारसातारा18 लाख 23 हजाररत्नागिरी-सिंधुदुर्ग-14 लाख 40 हजारकोल्हापूर-18 लाख 68 हजार आणि हातकणंगले-17 लाख 65 हजार.

 

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा