येत्या काळात ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यावेळी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, अशोक वैती, माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि संजय भोईर, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, वाहतूक कोंडीतून ठाणे शहराला मुक्त करण्यासाठी काम सुरू आहे. निरोगी शहर उभे करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आजचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले जात आहे. आपल्या शहरांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले पाहिजेत. मुलांमध्ये कौशल्य आहे, त्यांच्यासाठी व्यासपीठ देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. विकासाची ही कामे जनतेच्या पैशातून होत आहेत. त्यामुळे त्यात गुणवत्तेत कोणतीही तडजोड होता कामा नये. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कामे सुरू आहेत. तसेच संपूर्ण ठाणे व मुंबई महानगर प्रदेशात क्लस्टर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या सोहळ्यात स्पष्ट केले.
रस्ते रुंद आणि चांगले असल्यास त्या शहराची वेगाने प्रगती होते. त्यामुळे सरकाराने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड, मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक आदी प्रकल्पांना चालना दिली. लवकरच नागपूर –मुंबई समृद्धी महामार्गाचे ठाणेपर्यंतचे काम पूर्ण होणार आहे. हा मार्ग संपूर्ण पर्यावरण पूरक आहे.  या सरकारने लोकहिताला प्राधान्य देऊन निर्णय घेतले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात, कै. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने ओजस प्रवीण देवतळे, अंजली गोपीचंद स्वामी, प्रथमेश जावकर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तिरंदाजपटूंचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खेळाडूंसह राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाचे संचालक आणि अर्जुन पुरस्कार विजेते संजीवकुमार सिंग, विश्व तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर उपस्थित होते.
===================================================
  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL