नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबईः

नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२० २१ चे अंदाजपत्रक  महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांना आज सादर केले. आरंभीची शिल्लक रु. 1905.69 कोटी व रु. 2369.62 कोटी जमेचे आणि रु.3057.54 कोटी खर्चाचे  सन 2019-20 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 1217.76 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 3850 कोटी जमा व रु. 3848.91  कोटी खर्चाचे आणि रु.1.09 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2020-21 चे मूळ अंदाज मा. स्थायी समितीच्या समोर सादर करण्यात आले.

कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असल्याचे महापालिका आयुक्त मिसाळ यांनी अर्थसंकल्पसादरिकरणानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार उपस्थित होते.

या अर्थसंकल्पाद्वारे गुणवत्ता पूर्ण सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असून शहारात चार मोठी उड्डाणपूल करण्याचे प्रस्तावित आहेत. पाणीबिलात 14 टक्यांची तूट आहे ही तूट भरून काढण्यासाठी पाणीबिलात वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजूरीसाठी आणणार, आरोग्य सेवेवर भर देतानाच अधिकाधिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी आणणार असल्याचेही आयुक्त मिसाळ यांनी सांगितले.
सिडकोकडून विविध नागरी सुविधांचे 554 भूखंड हस्तांतरीत झालेले असून आणखी 520 भूखंडांची मागणी सिडकोकडे करण्यात आलेली आहे. एम.आय.डी.सी. कडून महानगरपालिकेस विविध नागरी सुविधांचे एकूण 61 भूखंड हस्तांतरीत झालेले असून 233 भूखंडांची मागणी करण्यात आलेली आहे.

नवीन प्रस्ताव

पाम बीच मार्गावर ठाणे- बेलापूर मार्गाबरोबरच शहरात पर्यायी रस्ता उपलब्ध होण्यासाठी घणसोली मार्गावर मिसिंग लिंक प्रस्तावित आहे.

वाशी सेक्टर १७ येथे महात्मा फुले चौक ते कोपरी उड्डाणपूलापर्यंत उन्नत मार्ग बांधणार

टीटीसीमध्ये पशुवधगृह बांधणार
२९ गावांना मूळ गावांची प्रवेशद्वारे उभारणार
दरवर्षी १ हजार विद्यार्थ्यांची वाढ त्यामुळेच शाळा इमारती बांधणार

पामबीच रोडवर सायकल ट्रॅक बांधणार
बेलापूर सेक्टर ८ मध्ये समाजमंदिर बांधणार
सानपाडा सेक्टर ११ मध्यवर्ती ग्रंथालय बांधणार
नेरूळ सेक्टर ३८ मध्ये वृध्दाश्रम बांधणार
तुर्भे सेक्टर २२ येथे जुन्या कोंडवाड्याचे सुशोभीकरण पूर्ण करून नागरिक वापरासाठी उपयोगात आणणार

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पारसिक हिल ते ऐरोली एक्सप्रेस फिडर पाइपलाइन टाकणार
तुर्भे आणि कोपरखैरणे येथील मलनिस्सारण प्रकिया केंद्रात ऑनरोबीक डायजेस्टर पध्दतीने बायोगॅस पासून वीज निर्मिती करणार. त्यासाठी  वर्गीकरण केलेला ओला कचरा, हॉटेलमधून तयार होणारा ओला कचरा, मलनिःसारण केंद्रात निर्माण होणारा मैला एकत्रितरणे गोळा करून ५० टन क्षमतेचे दोन प्रक्रिया केंद्र उभारणार.

प्रत्येक नोडमध्ये १ हवा मापन यंत्र त्यासाठी १६.८४ कोटी खर्च
१२६ ठिकाणी पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टिम, सीसीटीव्ही यंत्रणेसाठी 154.34 कोटी खर्च अपेक्षित

यांत्रिक साफसफाईसाठी ८ अत्याधुनिक वाहने बसथांबे साफ ठेवण्यासाठी २ वॉशर घेण्याचे प्रस्तावित.

मियावाकी फॉरेस्ट ही संकल्पना राबविणार
विद्युत पशुदहन व्यवस्था करणार

८ नवीन ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करणार

अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेसाठी रिमोट ऑपरेटेड फायर फायटिंग रोबोट खरेदी करणार
खाडी, तलावांत बुडून मृत्यू होण्याची स्थिती हाताळण्यासाठी जवानांना अंडर वॉटर डायविंग ट्रेनिंग व डायविंग सूट खरेदी प्रस्तावित

परिवहन साठी ९५ कोटींची तरतूद