गोवा विमानतळावर मिग 29 के विमानाचा ड्रॉप टॅंक कोसळला

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 8 जून 2019 :

गोवा विमानतळावर मिग 29 के या लढाऊ विमानाचा ड्रॉप टॅंक आज दुपारी 2 च्या सुमारास कोसळला.यामुळे विमानतळावर आग लागली. सुरक्षेच्या कारणास्तव गोवा विमानतळ काही वेळासाठी बंद करण्यात आले आहे.

गोवा विमानतळावरून मिग 29 के या विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानाची वेगळी होणारी इंधन टाकी ड्रॉप टॅंक धावपट्टीवर कोसळली. त्यानंतर आग लागली. या अपघातामध्ये वैमानिक बचावला आहे. मात्र विमानतळ काही वेळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हा विमानतळ हवाईदल आणि नागरिकांसाठीही वापरला जातो. यामुळे काही तास विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे.