मॉन्सून केरळमध्ये दाखल

दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 8 जून 2019:

भारतीय हवामान खात्याने केरळ मध्ये मॉन्सून दाखल झाल्याचे आज अधिकृतरित्या जाहीर केले आहे. पुढील 2-3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होईल अशी शक्यताही वर्तविली आहे. केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन दोन दिवस उशीराने झाले आहे.

सर्वप्रथम केरळमध्ये मॉन्सून दाखल होतो. त्यानंतर देशाच्या इतर राज्यांमध्ये त्याचे आगमन होते. यंदा मॉन्सून आठवडाभर उशीराने दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. 10 जून पर्यंत कोकणात मॉन्सून दाखल होईल.13 ते 15 जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होईल. बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासांत मॉन्सून सक्रीय होण्याची शक्यता वर्तविली आहे.

——————————————————————————————————