होम क्वॅारंटाइन असूनही घराबाहेर फिरणाऱ्या दोघांविरोधात नवी मुंबईत गुन्हे दाखल

 

  • अविरत वाटचाल न्यूजनेटर्क
  • नवी मुंबई, २३ मार्च २०२०

कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली असतानाही  त्याकडे दुर्लक्ष करून होम क्वारंटाइन असतानाही घराबाहेर फिरत असल्याच्या घटना नवी मुंबईत उघडकीस येत असून एनआरआय आणि सानपाडा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महाराष्ट्रात अखेर संचारबंदी लागू
https://bit.ly/3bo0SI2
  • पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेली व्यक्ती ही काही दिवसांपूर्वी इंग्लंडहून आलेली आहे. तसेच ही व्यक्ती सीवुड परिसरात वास्तव्याला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीला घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र कुणालाही पूर्वकल्पना न देता ही व्यक्ती घराबाहेर पडून परिसरात फिरत असल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी त्वरीत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेवून गुन्हा दाखल केल्याची माहिती एनआरआय पोलिसांनी दिली.

‘होम क्वारंटाईन’ चे काटेकोर पालन न करणा-या व्यक्तींवर होणार कायदेशीर कारवाई
https://bit.ly/33z3L62

  • दुसऱ्या प्रकरणात १७ मार्चला दुबईहून जोडपे आले होते.  सानपाडा  सेक्टर १३ इथल्या घरात अलगीकरण करून राहात होते. आज सकाळी पालिकेच्या पथकाने पाहणी केली असता पत्नी घरात आढळून आली नाही.  पत्नी मुलाकडे मुंबईला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी गंभीर दखल घेत त्या महिलेविरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सानपाडा पोलिसांनी दिली. 

 

  • दरम्यान, कोरोना विषाणुचा संसर्ग होवू नये म्हणून नागरिकांनी घरातच रहावे, असे वारंवार आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे  नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरातच रहावे, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केले आहे.

=======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा