समान कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे पाच जणांची जमिती

  • राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी मोर्चेबांधणीला वेग

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, १३ नोव्हेंबर २०१९

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र तरीही काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे नवीन समिकरण जुळून येत असून आगामी काळात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांना सोयीचे जाईल, असा समान कार्यक्रम ठरविण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली असून या बैठकीत काँग्रेस सोबत समान कार्यक्रम ठरवण्यासाठी ५ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांचा समावेश आहे, अशी माहिती पक्ष कार्यालयातून देण्यात आली.

==================================================

इतर बातम्यांचाही मागोवा