कोकण विभागात 95 रूग्णालये अलगीकरण केंद्र म्हणून घोषित

178 केंद्र विलगीकरण कक्ष

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई

कारोना विषाणूचा  प्रदूर्भाव पूढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनामार्फत  विविध उपायोजना करण्यात येत आहेत.  कोरोना बाधीत किंवा संशयीत रुग्णांचे अलगीकरण (आयसोलेशन) करण्यासाठी कोकण विभागाअंतर्गत जिल्ह्यांमधील एकूण 95 रूग्णालयांना अलगीकरण केंद्र (आयसोलेशन सेंटर) व 178 विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) म्हणून घोषित करण्यात आले आहे.  इस्पीतळांमधील वैद्यकीय व्यवस्था  WHO (World Health Organisation) कडून ICMR (Indian Council of Medical Research) ला देण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचीत प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.   या रूग्णालयामधील बेडची संख्या, ऑक्सीजन व्यवस्था व व्हेंटिलेटर्सची संख्या  या मार्गदर्शन सूचित दिल्या नूसार तपासण्यात आलेली आहे.  या अलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 5 हजार 981 रुग्णांच्या अलगीकरणाची क्षमता आहे तर विलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 8 हजार 318 रुग्णांच्या विलगीकरणाची क्षमता आहे. आतापर्यंत विविध अलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 2 हजार 275 रुग्णांच्या अलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.  तसेच विलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 854 रुग्णांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.           

कोकण विभागात आतापर्यंत फक्त 32 रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहेत.  पुढील दिवसांत व्हेंटिलेटरची आवश्यकता वाढल्यास तसे पुरेसे व्हेंटिलेटरर्स तयार आहेत अशी माहिती कोकण विभागिय आयुक्त शिवाजी दौंड  यांनी दिली.

आवश्यक त्या ठिकाणी खाजगी वैद्यकीय अधिकारी तपासणीसाठी तात्पुरत्या स्वरुपात महानगरपालिका स्तरावर नियुक्त करण्यात आले आहेत.

——————————————————————————————————