अभिजीत बांगर नवी मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १४ जुलै २०२०

नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजीत बांगर यांनी १४ जुलै रोजी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला. पुणे विद्यापीठातून एम.ए. (अर्थशास्त्र) असणारे  अभिजीत बांगर हे 2008 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकारी आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारताना त्यांनी नवी मुंबई शहरातील कोव्हीड 19 स्थिती नियंत्रित आणण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल असे स्पष्ट करीत सर्वांच्या सहयोगाने नवी मुंबईकर नागरिकांना अभिप्रेत असलेले अधिक चांगले काम केले जाईल असा विश्वास व्यक्त केला.

  • अविरत वाटचाल: लाइक करा.सबस्क्राइब करा. शेअर करा.
  • https://youtu.be/x3Mm16mGWJo

नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर कार्यरत असणा-या अभिजीत बांगर यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्यातील माणगावचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर विधायक कार्य केलेले आहे. काही काळ त्यांनी पुण्यातील गोखले इन्स्टिट्युटमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केलेले आहे.

  • नवनिर्मित पालघर जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी कामगिरी केली. अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांची कारकिर्द लक्षणीय ठरली. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन ओला व सुका कच-याचे निर्मिती स्थळावरच वर्गीकरण करणेबाबत शहरातील नागरिकांना प्रोत्साहित करीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळेमुळे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर शहराचे मानांकन उंचावले गेले. याशिवाय नागपूर महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी अनेक लोकोपयोगी सुविधा, उपक्रमांना चालना दिली. सध्या ते नागपूर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. विविध लोकाभिमुख वैशिष्ट्यपूर्ण कामांमुळे कृतीशील प्रशासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

===================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा