मोराज रेसिडेन्सीमध्ये दीड हजार नागरिकांचे लसीकरण

18 वर्षांंवरील नागरिकांना फोर्टिस हॉस्पिटलच्या विद्यमाने कोविड प्रतिबंधक डोस

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 3 जून 2021:

मोराज रेसिडेन्सी मधील 500 नागरिकांचे कोविड प्रतिबंध लसीकरण केल्यानंतर सोसायटीच्या व्यवस्थापन कमिटीने पामबीच परिसरातील रहिवाशीयांना सुद्धा लसीकरणाचा  लाभ मिळावा यासाठी सानपाडा सेक्टर ०१,१३, १४, १५, १६, १६ए, १७, १८, व १९ सेक्टर्स मधील नागरिकांना आवाहन करण्यात आले होते . लसीकरणासाठी परिसरातील नागरिकांकडून तब्बल ३००० अर्ज दाखल झाले त्यानुसार ३१ मे  ते २ जून  या तीन  दिवसांमध्ये प्रतिदिन ५०० जण याप्रमाणे आतापर्यंत एकूण १५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

कस्तुरी सहकारी गृहनिर्माण संस्था ( मोराज रेसिडेन्सी) ही सानपाडा विभागातील एकूण ९१३ सदनिकाधारक असलेली अशी एकंदरीत ३००० निवासी लोकसंख्या असलेली सर्वात मोठी गृहनिर्माण संस्था आहे. सोसायटीमधील १८ ते ४५ वर्षा वरील नागरिकांना लस देण्यासाठी सोसायटीच्या आवारात कोविड लसीकरण आयोजित करण्यास परवानगी मिळावी, यासाठी सोसायटीने नवी मुंबई महानगरपालिकेकडे  पत्रव्यवहार करून  सतत त्यासाठी पाठपुरावा केला होता. महानगरपालिकेकडून रीतसर परवानगी मिळाल्यानंतर मोराज मध्ये लसीकरण सेंटर आयोजित करण्यासाठी संस्थेचे  अध्यक्ष गुलाब हांडे आणि सचिव जी.जी बनसोडे यांनी फोर्टिज आणि  अन्य काही हॉस्पिटल बरोबर  चर्चा केली होती. यानंतर फोर्टिस हॉस्पिटल कडून त्यास प्रतिसाद मिळाला आणि  ३१ मे रोजी नवी मुंबई  महानगरपालिकेचे  माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, युवानेते निशांत भगत, स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत आणि रुपाली निशांत भगत यांच्या हस्ते डॉक्टर्स आणि परिचारिकाचे स्वागत करून प्रत्यक्ष लसीकरणास  सुरुवात करण्यात आली.

मोराज रेसिडेन्सी सोसायटीमध्ये लसीकरण मोहीम कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर  यांचे नागरिकांसह सोसायटी कमिटीने मनापासून आभार मानले आहेत. फोर्टिस हास्पिटलने १५०० डोस उपलब्ध करून दिले त्याबद्दल हॉस्पिटलचे तसेच सोसायटीचे सभासद, स्वयंसेवक, कमिटी मेंबर, सर्व सोसायटी व्यवस्थापनातील कर्मचारी यांनी हि लसीकरण मोहीम पार पडण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे देखील सर्वांचे आभार मानण्यात आले.

——————————————————————————————————-