नाना पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र सावंत यांच्यातर्फे नवी मुंबईत आरोग्य शिबीर आणि वृक्षारोपण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 5 जून 2021 :

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत नेरूळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज आरोग्य शिबीर आणि वृक्षरोपणाचे आयोजन करंण्यात आले होते. नेरूळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

नेरूळ काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात यानिमित्ताने श्रीराम कृष्ण नेत्रालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयालगत असलेल्या नेरूळ सेक्टर 2 येथील महापालिकेच्या उद्यानात काँग्रेस कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावला. यावेळी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष, वृक्षारोपण आणि संवर्धनाचे महत्व उपस्थितांना समाजावून सांगितले. यावेळी स्थानिक रहिवासीही कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, विजय कुरकुटे, प्रल्हाद गायकवाड, दिनेश गवळी, विनायक ताळेकर, रामभाऊ माने, शेलार, सुधीर पांचाळ, शेवंता मोरे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम  घेतले.

——————————————————————————————————