इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नेरूळमध्ये काँग्रेसचे ‘लॉलीपॉप’ आंदोलन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,7 जून 2021 :

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी नेरूळ तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज नेरूळ सेक्टर 6 मधील पेट्रोलपंपावर ‘लॉलीपॉप’ आंदोलन करण्यात आले. नेरूळ तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या चालकांना काँग्रेसच्या आंदोलनकर्त्याकडून ‘लॉलीपॉप’ चॉकलेट वाटण्यात आले.

आंदोलनादरम्यान सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‘अच्छे दिन’च्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी आंदोलनात काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी, काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, तालुका उपाध्यक्ष दिनेश गवळी, शेवंता मोरे, प्रभाग 85 चे काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष किशोर तांबे, ताळेकर, माने सहभागी झाले होते.
——————————————————————————————————