ठाण्यात अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवर धडक कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 2 सप्टेंबर 2021

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अनधिकृतपणे उभे राहत असलेल्या फेरीवाले व हातगाड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबतच्या तक्रारीनंतर आज ठाणे व कळवा परिसरातील फेरीवाले, हातगाड्या व दुकानासमोरील फूटपाथ अडवून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

ठाणे शहरात सकाळी 7 ते दुपारी 3 व दुपारी 3 ते 11 या दोन सत्रात कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे स्थानक परिसर, मार्केट परिसर व नौपाडा कोपरी  परिसरात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान ठाणे मार्केट परिसरात 10 ते 12 हातगाड्या जप्त करण्यात आल्या तसेच मार्केट परिसरात दुकानांसमोरील फूटपाथवर विक्री करणाऱ्या 120 किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी सॅटिस परिसर, मार्केट परिसर व नौपाडा- कोपरी परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटवून हा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला. सदर कारवाई दरम्यान ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे उपस्थित होते.

Other Video On You Tube

  • कळवा परिसरातही कारवाई

कळवा प्रभाग समितीअंतर्गत कळवा नाका, कळवा बाजारपेठ, कळवा पूर्व,  विटावा, आत्माराम पाटील चौक, खारीगांव मार्केट परिसर, 90 फूट रोड या परिसरात कारवाई करण्यात आली. यात 18 हातगाडी विक्रेते तर दुकानांसमोर फूटपाथवर विक्री करणाऱ्या 45 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

सदर दोन्ही ठिकाणची कारवाई ही सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, नौपाडा प्रभागसमितीतील अधिकारी कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने केली.

======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप