नवी मुंबईत सीसीटीव्ही लावा, पोलिसांची गस्त वाढवा

औद्योगिक क्षेत्रात चोरीचे प्रमाण वाढल्याने उद्योग मंत्र्यांच्या सूचना

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    ठाणे, १३ ऑक्टोबर २०२२

नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात चोरीचे प्रमाण वाढल्याने नवी मुंबई महापालिकेने सीसीटीव्ही लावावे तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलीस गस्ती वाढविण्याच्या सुचना उद्योग मंत्री सामंत यांनी दिल्या.

नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्यांबाबत बुधवारी महापे येथील हॉटेल रामाडा इन येथे आयोजित बैठकीत सामंत बोलत होते.
या बैठकीला नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा, वीज महामंडळाचे प्रादेशिक संचालक चंद्रकांत डागे, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


कामे वेळेवर पूर्ण न करणार्याद ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून चालणार नाही तर पोलिसांच्या मदतीने कारवाई करावी. रस्ते तयार करताना विद्युत विभागाच्या वायर तुटतात. त्या वेळेवर दुरुस्त होत नाही. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे यापुढे नवीन कामे सुरू करताना सर्व विभागाची परवानगी घेऊन सुरु करावीत अश्या सूचना सामंत यांनी संबंधित विभागाना दिल्या.

औद्योगिक क्षेत्रात पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी जलसंपदा विभागाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढून समस्या दूर करण्यात येईल, असे यावेळी सामंत यांनी सांगितले.