मध्य रेल्वेचा हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, मेन लाईनवर वाहतूक सुरू राहणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, २१ जानेवारी २०२३

रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेतर्फे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर २२ जानेवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यावेळी मेन लाईनवरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

 ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत
ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत  वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि

वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी  ४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि

चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी  ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द  राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना २२ जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. रविवार मेन लाईनवर मेगा ब्लॉक नाही.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र