नवी मुंबईत आपची भव्य जाहीर सभा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 17 मार्च 2024

नवी मुंबई- आम आदमी पक्षाची जाहीर सभा १५ मार्च रोजी नवी मुंबईत पार पडली. जनतेला सर्वोत्तम सरकारी आरोग्य सेवा, शिक्षण आणि मूलभूत गरजा पुरविण्याबाबत पक्षाची असलेली भूमिका यावेळी सभेत मांडण्यात आल्याची माहिती आपचे पदाधिकारी चिन्मय गोडे यांनी दिली.

बातमी वाचा : 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत लोकसभा निवडणूक, 4 जूनला निकाल

या कार्यक्रमाला महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील,उपाध्यक्ष धनंजय शिंदे,नवी मुंबई अध्यक्ष दिनेश महादूशेठ ठाकूर,ठाणे अध्यक्ष सतीश सलूजा,कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष धनंजय जोगदंड,भिवंडी शहर अध्यक्ष मसिह इकबाल,वसई विरार शहर अध्यक्ष बळवंत कुलकर्णी,उल्हासनगर शहर अध्यक्ष राज चंदवानी  उपस्थित होते.


आप महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी राज्य सरकारच्या दडपशाही कारभार व जाहिरातबाजी बाबत जोरदार टीका केली.केजरीवाल मॉडेल मधील सरकारी शिक्षण व्यवस्था अधोरेखित करत असताना शहरातील इतके वर्ष राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांची मुलं, नातवंड इथल्या सरकारी शाळेत का शिकत नाहीत असा सवाल महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी उपस्थित केला.

आम्ही नवी मुंबईतील लोकांपर्यंत आशेचा आणि बदलाचा संदेश आणण्यास उत्सुक आहोत,भ्रष्टाचारमुक्त आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा, शिक्षण आणि मूलभूत गरजा उपलब्ध करून देणारे शहर निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. आम्हाला विश्वास आहे की एकत्र काम करून, आम्ही ही दृष्टी साध्य करू शकतो आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडवू शकतो असे आप नवी मुंबई अध्यक्ष दिनेश महादू शेठ ठाकूर म्हणाले.

बातमी वाचा : शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर कारवाई करा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री

कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर असताना नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या बद्दल समर्थकांचे आभार व्यक्त केले.

========================================================