बाल महोत्सव उत्साहात साजरा

नवी मुंबई,27 डिसेंबर 2016 /AV News Bureau :

bal-mahotsav

नवी मुंबई महानगरपालिकेनं आयोजित केलेला बालमहोत्सव अतिशय उत्साहात पार पडला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी व महापालिकेच्या शाळांमधील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. मुलांसह पालकांच्या गर्दीनं वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह  तुडूंब भरलं होतं.

bal-4

bal3सकाळी 10 वाजल्यापासून मुलांच्या हाऊसफुल्ल गर्दीत सादर झालेल्या एकाहून एक सरस कार्यक्रमांना बाल प्रेक्षकांनी टाळ्यांची कौतुकाची उत्स्फुर्त दाद दिली. बालवाडीतील छोट्या मुलांनी सादर केलेले मनोरंजक कार्यक्रम ते मोठ्या मुलांची दिमाखदार नृत्ये श्रोत्यांची दाद मिळवून गेली. गीत नृत्यामधून सादर झालेली महाराष्ट्राची परंपरा, अवघं नाट्यगृह भक्तीमय करणारी दिंडी सामुहीक प्रतिसादामुळं नामगजरात रमली. वृक्षारोपण, शेतक-यांचे प्रश्न, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, सोशल मिडीयाचा अतिरेक, देशभक्ती, स्वच्छ भारत अभियानाचा संदेश असे अनेक समाज उपयोगी संदेश विविध कलाविष्कारातून मुलांनी सादर केले. याशिवाय जादूचे प्रयोग, बालनाटिका यामधूनही मुलांचे उत्तम अभिनय दर्शन घडलं.

बाल महोत्सवाच्या अनुषंगानं आयोजित करण्यात आलेल्या वेषभुषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाटिका स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांतील विजेत्या मुलांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.

 

  • पहिलाच बालमहोत्सव यशस्वी –सभापती सायली शिंदे

bal1bal2

मुलांच्या अत्यंत उत्साही सहभागानं यशस्वी झाला व पहिल्यांदाच आयोजित केलेल्या महोत्सव आयोजनाचा हेतू सफल झाला याचा आनंद व्यक्त करीत महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सायली शिंदे यांनी महिलांप्रमाणेच मुलांनाही सुविधा पुरविण्यासाठी समिती तत्पर आहे असं सांगितले.

यावेळी व्यासपिठावर पाणीपुरवठा व मलनि:स्सारण समितीचे सभापती निवृत्ती जगताप, उद्यान व शहर सुशोभिकरण समितीच्या सभापती तनुजा मढवी, नगरसेविका वैशाली नाईक व संगिता बो-हाडे आणि समाज विकास विभागाच्या उप आयुक्त तृप्ती सांडभोर व सहा. आयुक्त सुभाष गायकर आदी मान्यवर उपस्थित होते.