विजय चौगुले, नामदेव भगत स्थायी समिती सदस्यपदी

नवी मुंबई, 26 एप्रिल 2017/AV News Bureau:

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 20 (3 व 4) अन्वये नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे 8 सदस्य 1 मे 2016 रोजी मध्यान्ही निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी आज सर्वसाधारण सभेमध्ये विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, अशोक गावडे, देविदास हांडेपाटील, व्दारकानाथ भोईर, नामदेव भगत,  दिपाली संकपाळ व  ऋचा पाटील या 8 सदस्यांची नामनिर्देशनाव्दारे स्थायी समिती सदस्यपदी निवड झाली आहे. महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड,  महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले.