कोपरखैरणे पोलिसांकडून 50 मोबाईल मूळ मालकांना परत

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    नवी मुंबई, 15 एप्रिल 2024

कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले मोबाईल फोन शोधण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आलं आहे. देशातल्या विविध राज्यांतून 50 मोबाईल नवी मुंबई पोलिसांनी पुन्हा मिळवले आहेत.
नोंद असलेल्या चोरीला गेलेल्या आणि गहाळ मोबाईल फोनबाबतच्या तकारीचा आढावा परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी घेतला. या तक्रारींची दखल घेऊन या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी उपायुक्त डहाणे यांनी पोलीस ठाण्याच्या स्तरावर विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले . त्या प्रमाणे कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी एका विशेष पथकाची स्थापना करून चोरीला गेलेले आणि गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासाची मदत घेत पोलिसांनी विविध राज्यातून 50 मोबाईल हस्तगत केले आहेत. आज उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. 50 पैकी 28 फोन मालकांनी आपले मोबाईल आज ताब्यात घेतले.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

========================================================


========================================================