वाहतुकीचे नियम पाळण्याचे नवी मुंबई पोलिसांचे आवाहन
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 6 फेब्रुवारी 2025
वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक नियम तोडणाऱ्यांना आळा बसावा यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत धडक कारवाई केली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजारहून अधिक वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली.
क्लिक करा: आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि सहपोलीस आयुक्त दिपक साकोरे तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या काळात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात विशेष (विना सीटवेल्ट, विना हेल्मेट, रॅश ड्रायव्हिंग, लेन कटिंग, ब्लॅक फिल्म केसेस) मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
क्लिक करा : किनारपट्टी सुरक्षेसाठी सागर रक्षक एप (App)
या मोहिमेअंतर्गत एकुण विना सीट बेल्ट ५५४, विना हेल्मेट ७५९, रॅश ड्रायव्हिंग ३४. लेन कटिंग ७८, ब्लॅक फिल्म १९ अशा सुमारे 1444 केसेस करण्यात आल्या आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून यापुढेही बाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करुन बेजबाबदार पणे वाहन चालविणा-या वाहन चालकांवर कारवाई कऱण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.
————————————————————————————————
—————————————————————————————————