सिल्व्हर पॉइंट प्रेसमध्ये एचपी इंडिगो डिजिटल अॉफसेट

मुंबई, 25 जानेवारी २०१७ /AVIRAT VAATCHAL NEWS:

कॅनव्हास, सिंथेटिक आणि मेटलाइज सारख्या थरांवर उच्च दर्जाच्या प्रिंट्स तयार करण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे सिल्व्हर पॉइंट प्रेसच्या प्लांटमध्ये एचपी इंडिगो १२००० डिजिटल ऑफसेट प्रेस सुरू करण्यात आला आहे. सिल्व्हर पॉइंटची ही एचपी इंकची दुसरी इंडिगो डिजिटल आफसेट प्रेस ठरली आहे. सिल्व्हर पॉइं ही देशातील आघाडीची विविध प्रकारच्या प्रिटिंगचे काम करणारी कंपनी आहे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने कंपनीने महत्त्वाचे पाऊल उचलले असून एचपी इंडिगो डिजिटल ऑफसेट प्रेसमुळे सिल्व्हर पॉइंट प्रेसला ग्राहकांना प्रिटिंगचे उच्च दर्जाचे काम करून देता येणे शक्य होणार आहे.

सिल्व्हर पॉइंट प्रेस प्रायव्हेट लिमिटेड हा एचपी कंपनीचा २००९ पासूनचा सर्वात महत्त्वाचा भागीदार आहे. उत्पादनक्षमता वाढवण्याबरोबरच कमी कचरा व्हावा आणि छपाईचा दर्जा आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार रहावा तसेच डिजिटल क्षएत्रात बी-२ साइजची प्रतिमा छपाई करता यावी यासाठी सिल्व्हर पॉइंटने एचपी इंडिगो १२००० डिजिटल ऑफसेट प्रेस बसवली आहे. “जगभरातील ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी आणि त्यांना छपाईचा अभूतपूर्व असा अनुभव देण्यासाठी आम्ही सातत्याने कल्पकतेवर भर देत आलो आहोत.त्याचबरोबर प्रिंटिंग क्षेत्रातील त्यांचा व्यवसाय अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”असे मत एचपी इंडिगो डिव्हिजनचे महाव्यवस्थापक अॅलोन बार शॅनी यांनी व्यक्त केले.

“सिल्व्हर पॉइंट हा आमचा सर्वात मौल्यवान असा ग्राहक आहे. त्यांचे व्यवसाय वाढीचे धोरण लक्षात घेऊन आम्ही त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे एचपी इंक इंडियाच्या इंडिगो अँड इंकजेट वेब प्रेसचे कंट्री मॅनेजर ए. अप्पादुराई  यांनी सांगितले.

व्यावसायिक/ऑफसेट प्रिटिंग विभागात आम्ही पहिल्यांदाच एचपी इंडिगो १२००० ऑफसेट प्रेसची स्थापना केली आहे. एचपी इंडिगो १२००० मुळे सर्वच आघाड्यांवर चांगल्या दर्जाची छपाई करता येईल त्याचबरोबर प्लास्टिकच्या उत्पादनांवरही छपाई करता येईल, त्याच पांढऱ्या रंगासह सात विविध रंगांचा वापर करण्याची सोय आहे अशी माहितीही त्यांनी दिली.