मुंबईत चित्ररथाद्वारे मतदार जागृती

election rath

मुंबई, 31 जानेवारी 2017/AV News Bureau:

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे चित्ररथाद्वारे शहरात ठिकठिकाणी मतदार जागृती करण्यात येत आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील शिवाजी पार्कवर झालेल्या संचलनात या चित्ररथाचा समावेश होता.  73 आणि 74 व्या  राज्य घटना दुरुस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या आणि सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे.

सर ज. जी. कला महाविद्यालयाने त्याची निर्मिती केली आहे. इतर विविध माध्यमांतूनही मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. चित्ररथ त्याचाच एक भाग आहे. चित्ररथाची आकर्षक रचना व रंगसंगतीमुळे त्याकडे लक्ष वेधले जात आहे. चित्ररथावर एलएडी पडदा लावण्यात आला आहे. त्यावर विविध ध्वनि चित्रफिती व जागृतीपर संदेशही दाखविण्यात येत आहेत.

प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर संचलन झाल्यानंतर हा चित्ररथ गेट वे ऑफ इंडिया, हजी अली व दादर येथे नेण्यात आला होता. आज वांद्रे (पूर्व) येथे असून या सर्व ठिकाणी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. हा चित्ररथ 6 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुंबईत असेल त्यानंतर ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार जागृतीसाठी नेण्यात येईल.

येथे असेल चित्ररथ

  • 1 फेब्रुवारी 2017: बॅन्डस्टँड (वांद्रे पश्चिम)
  • 2फेब्रुवारी 2017:संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (बोरिवली)
  • 3फेब्रुवारी 2017: जुहू चौपाटी (सांताक्रुझ)
  • 4फेब्रुवारी 2017: सागर कुटीर (वर्सोवा चौपाटी)
  • 5फेब्रुवारी 2017: डायमंड गार्डन (चेंबुर)
  • 6फेब्रुवारी 2017: मुलुंड