केंद्रीय अर्थसंकल्प सादर

तीन लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

नवी दिल्ली,1 फेब्रुवारी 2017:

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सुरूवातीला देशभरातील नागरिकांनी नोटाबंदीला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले. सरकारने महागाई नियंत्रित ठेवली असून मंदावलेली अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात मंदी असतानाही देशात मात्र भरभराटीचे चित्र आहे.परदेशी चलनसाठ्यात मोठी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. काळ्या पैशाविरोधात सरकार लढाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रेल्वे अर्थसंकल्प या मुख्य अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरला.

अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा

  • शेतक-यांसाठी 10 लाख कोटींचे कृषीकर्ज उपलब्ध करणार
  • कृषी विकासाचा दर 4.1 टक्के राहिल असा अंदाज
  • वार्षिक उत्पन्न 50 लाख ते 1 करोडपर्यंत असणा-यांना 10 टक्के सरचार्ज भरावा लागणार
  • 3 लाख रूपये वार्षिक उत्पन्न असणा-यांना कर माफ
  • 3 ते 5 लाख उत्पन्नावर केवळ 5 टक्के कर
  • देशातल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
  • वाहतूक क्षेत्रासाठी 41 लाख कोटींची तरतूद, भारत नेट प्रोजेक्टसाठी 10 हजार कोटींची तरतूद
  • पायाभूत सुविधांसाठी ३.९६ लाख कोटींची तरतूद
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC पॉलिसीवर 8% टक्क रिटर्न मिळणार
  • PPP मॉडेलनुसार छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणार
  • राष्ट्रीय महामार्गांसाठी ६७ हजार कोटींची तरतूद
  • २.५ लाख ते ५ लाख उत्पन्नात ५ टक्के सवलत
  • रेल्वेच्या ई-तिकीटांवर सेवा कर नाही
  • 2020 पर्यंत ब्रॉडगेजद्वारे मानवरहित क्रॉसिंग पध्दत बंद करणार
  • रेल्वे सुरक्षेसाठी 1 लाख कोटींची तरतूद
  • 2011 पर्यंत सर्व रेल्वे कोचमध्ये बायो टॉयलेट
  • 3500 किलोमीटरची नवी रेल्वे लाईन टाकणार
  • मेट्रो रेल्वेसाठी नवे धोरण
  • 2 हजार रेल्वे स्थानकांवर सौर उर्जा पध्दती
  • पर्यटन आणि तिर्थस्थळांसाठी नव्या योजना