16 व्या डी.वाय.पाटील T 20 कप सामन्यांना सुरूवात

16 संघांचे 31 सामने

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 24 फेब्रुवारी 2020

गेली 15 वर्षे सातत्याने खेळवण्यात येणा-या डी.वाय.पाटील टी 20 कप स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली आहे. यंदाचे हे सोळावे वर्ष असून नेरूळ इथल्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगणारी ही स्पर्धा 6 मार्च पर्यंत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज डी.वाय.पाटील क्रिडा समूह आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.

या स्पर्धेमध्ये 16 संघादरम्यान दररोज 4 सामने खेळवले जाणार आहेत. एकूण 31 सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये 240 खेळाडू सहभागी होणार आहेत. 4 आणि मार्च रोजी उपांत्यपूर्व सामने खेळवले जाणार असून 6 मार्च रोजी उपांत्य आणि अंतिम सामने होणार आहेत. शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, अनमोसप्रित सिंग, मनिष पांडे, श्रेयर अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसम, शिवम दुबे, दिव्यांश सक्केना, दिनेश कार्तिक, मनदिप सिंग, आदित्य तरे, सिध्देश लाड यांसारखे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती डॉ.विजय पाटील यांनी पत्रकारपरिषदेत दिली.  हि संपूर्ण स्पर्धा प्रेक्षकांना मोफत पाहता येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

 

डी.वाय.पाटील A आणि B, मुंबई कस्टमस्, आरबीआय, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, एअर इंडिया, इंडियन ऑईल, बीपीसीएल, इन्मक टॅक्स, रिलायन्स-1, जैन इरिगेशन, इंडियन ऑईल, इंडियन नेव्ही, सीएजी, बॅंक ऑफ बरोडा, कॅनरा बॅंक हे संघ सहभागी होणार आहेत.

भविष्यात क्रीडा वास्तू या मल्टि फंक्शनल होणार आहेत. त्याप्रमाणे डी.वाय.पाटील स्टेडियममध्येही ही पध्दती अवलंबली जाणार आहे.  वेगवेगळ्या खेळांसाठी एकाच ठिकाणी मैदान उपलब्ध व्हावे यासाठी हे मैदान आऊटफोल्ड करण्याबाबत विचार सुरू असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

——————————————————————————————————इतरही बातम्यांचा मागोवा