10महापालिका निवडणुकांसाठी 9,199 उमेदवार

पहिल्या टप्प्यातील 15 जि.प.साठी 4,278; तर 165 पं.स.साठी 7,693 उमेदवार
मुंबई, 13 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:
मुंबई, ठाण्यासह राज्यातील 10 महानगरपालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 199 उमेदवार आपले नशीब आजमवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याशिवाय पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या 15 जिल्हा परिषदेच्या 855 जागांसाठी 4 हजार 278 आणि 165 पंचायत समित्यांसाठी एकूण 1 हजार 712 जागांसाठी 7 हजार 693 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारी 2017 रोजी 15 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचा दोन्ही टप्प्यात समावेश असून पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील 8; तर दुसऱ्या टप्प्यात 4 पंचायत समित्या आणि त्यातील निवडणूक विभागांचा समावेश आहे. मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी 23 फेब्रुवारीला होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदांच्या 654 जागासांठी छाननीनंतर 6 हजार 367 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. 118 पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 10 हजार 879 नामनिर्देनशपत्रे वैध ठरली आहेत. नामनिर्देशनपत्रांच्या माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. ही मुदत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 13 फेब्रुवारी तर अपील असलेल्या ठिकाणी 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.

महानगरपालिका निवडणूक माहिती

mahapalika

जिल्हा परिषद निवडणूक माहिती

पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदनिहाय जागा आणि उमेदवार:

panchayat samitya

या जिल्हा परिषदांतर्गत165 पंचायत समित्या आहे. त्यांच्या एकूण 1712 जागा असून त्यासाठी 7,693 उमेदवार रिंगणात आहेत.