मध्ये रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

मुंबई,4 मार्च 2017/AV News Bureau:

ओव्हरहेड वायर आणि रेल्वे मार्गांच्या दुरूस्ती तसेच देखभालीच्या कामासाठी उद्या मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

माटुंगा-मुलुंड डाउन फास्ट मार्गावर सकाळी 10.15 ते दुपारी 3.15 पर्यंत.

सकाळी 9.38 ते दुपारी 2.54 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या डाउन फास्ट गाड्या माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान स्लो मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सायन-मुलुंड स्थानकांदरम्यान सर्व ठिकाणी थांबतील. ठाण्यापासून पुढे जाणाऱ्या फास्ट गाड्या मुलुंड स्थानकापासून पुन्हा फास्ट मार्गावरून चालविल्या जातील.

सकाळी 10.42 ते दुपारी 3.18 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या अप मार्गावरील फास्ट आणि सेमी फास्ट गाड्या आधीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांत थांबतील.

मेगाब्लॉकच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्या माटुंगा-मुलुंड स्थानकांच्यादरम्यान स्लो मार्गावरून चालविण्यात येतील.

नेरुळ-मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत.

सकाळी 10.11 ते दुपारी 3.29 या काळात सीएसटी ते पनवेल/बेलापुर/वाशी दरम्यान डाउन मार्गांवर  आणि सकाळी 10.29 ते दुपारी 3.46 या काळात पनवेल/बेलापुर/वाशी ते सीएसटी दरम्यान अप मार्गावर मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात सीएसटी-मानखुर्द आणि ठाणे-पनवेल मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात ट्रान्सहार्बर/ मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.