वाढदिवसानिमित्त उरण येथील डोंगरावर १५० झाडे लावली

 

पक्षीप्रेमी आनंद मढवी यांचा सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांच्या सहकार्याने उपक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • उरण, १० जून २०२०

उरण तालुक्यातील सर्पमित्र आणि पक्षीमित्र आनंद मढवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चिर्ले गावालगतच्या दुधेला डोंगरावरील आई एकविरा मंदीराच्या परिसरात वन्यजीव निसर्ग संस्थेने वृक्षारोपण करण्यात आले.  ह्या वृक्षलागवडी करिता उलवे येथील समाजसेवक किरण एकनाथ मढवी यांनी ५१ वटवृक्ष आणि ईतर १०० देशी झाडे अशी एकुण १५१ झाडे या संस्थेला मोफत वाटप करण्यात आली होती. यावेळी पक्षी मित्र आनंद मढवी व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या वृक्षलागवडीच्या सेवाभावी कार्यासाठी उपस्थित असलेले मित्र परिवार, चिर्ले ग्रामस्थ, व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि खास करुन समाजसेवक किरण मढवी उलवे यांचे आनंद मढवी यांनी आभार व्यक्त करुन सर्वांना धन्यवाद दिले. आणि ह्या सर्व वृक्षांच्या संवर्धनाची जिम्मेदारी संस्थेने घेतल्याने संस्थेचेही सर्व स्तरांवर आभार व्यक्त होत आहे.

उलवे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नीसह उलवे परिसरात वटवृक्षांची लागवड केली होती. वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो आहे. त्याचा विपरित परिणाम आपल्याच जीवनावर होत आहे. त्यामुळे भावी पिढीच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होणे आवश्यक आहे. यासाठीच आपण दरवर्षी विविध प्रकारची रोपे तयार करून वृक्षारोपण करीत असल्याची माहिती समाजसेवक किरण मढवी यांनी दिली.

 

================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा