नाना – रजनिकांत आमने सामने

अविरत वाटचाल

मुंबई, 19 मे 2018:

दोन दिग्गज कलाकार एकत्र आल्यानंतर मनोरंजनाची शंभर टक्के गॅरंटी मिळते, यात शंका नाही. त्यातही  नाना पाटेकर आणि रजनिकांतसारखे स्टार एकत्र आले तर मग बघायलाच नको. प्रहिल्यांदाच प्रेक्षकांना या दोन महान कलाकारांमधील जुगलबंदी पहायला मिळणार आहे. निमित्त आहे काला या चित्रपटाचे.

 

नाना पाटेकर आणि रजनिकांत यांच्यातील राजकीय ड्रामा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. धारावीचा किंग हा या चित्रपटाचा गाभा आहे.

धनुष हा चित्रपटाचा निर्माता असून पी. रंजित डायरेक्टर आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, रजनिकांत यांच्याव्यतिरिक्त हुमा कुरेशीसुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रजिकांत यांनी मुंबईत बराच काळ शुटींग केले आहे.

येत्या 7 जून रोजी सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. सुपरस्टार रजनिकांत आणि अभिनयाचा सम्राट नाना पाटेकर यांची पडद्यावरची जुगलबंदी प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवील, यात शंका नाही. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्वीटरवर काला चित्रपटाचे नवीन पोस्टर ट्वीट केले आहे.